अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं डोळा मारत दिली प्रिया प्रकाशला ‘टक्कर’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा कातिल अदांजावाला डोळा मारतानाचा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला होता की, रातोरात इंटरनेट सेंसेशन बनली होती. गोळी झाडत डोळा मारतानाचा तिचा अंदाज लोकांना खूप आवडला होता. पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. परंतु या व्हिडीओत प्रिया नाही तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. शिल्पाचा हा नवीन व्हिडीओ आहे परंतु अदाज मात्र तोच आहे डोळ्यांनी गोळी मारण्याचा. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.tiktok.com/@theshilpashetty/video/6802860437915438341

शिल्पानं टिकटॉक अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये शिल्पा म्हणते, “मीही दबंग. तुम्हाला कोणता लुक जास्त आवडला.” शिल्पाच्या या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. लाखो चाहत्यांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

अलीकडेच तिचा नागिन डान्सचा व्हिडिओ समोर आला होता जो व्हायरल झाला होता. यानंतर आता तिचा हा दबंगवाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नुकतेच निकम्मा आणि हंगामा 2 हे सिनेमे साईन केले आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वीच शिल्पा सुपर डान्सर चॅप्टर 3 हा डान्स रिअ‍ॅलिटी शो जज करताना दिसली होती.