शिल्पा शिंदेचे खुलं ‘आव्हान’ ! पाकिस्तानात जाऊन ‘परफॉर्म’ करणार, बघू कोण आडवतंय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या झालेल्या लग्नात काही दिवसांपूर्वी गायक मीका सिंह यांना सादरीकरण केले होते. यामुळे देशभरातील लोक त्यांच्यावर नाराज आहेत. यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मीकावर बॅन आणला. परंतू माफी मागितल्यानंतर हा बॅन हटवण्यात आला आहे.

यानंतर आता बिगबॉस फेम शिल्पा शिंदेने मात्र मीकाला सपोर्ट केला. तसेच तिने पाकमध्ये परफॉर्म करण्याबद्दल खुले आव्हान दिले आहे. शिल्पा शिंदेने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन मीका सिंहला समर्थन दिले आहे आणि म्हणाली की, त्यांना घाबरायची गरज नाही. त्यांनी जे काही केले ते बरोबर केले. तसेच ती म्हणाली, त्यांनी माफी मागितली यामुळे मी खूप दु:खी झाले. त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी समजू शकते की, त्यांनी किती दबावाखाली येऊन माफी मागितली.

ती म्हणाली, मी या फेडरेशनला विचारु इच्छिते की, कोणतीही अधिकृत संस्था नसताना त्यांना हा हक्क कोणी दिला की, ते कलाकारांवर दबाव आणतील. ज्यामुळे कलाकारांना माफी मागावी लागेल. माझ्या बरोबर देखील असेच झाले होते. परंतू मी घाबरले नाही. आज मी अशा कोणत्याही फेडरेशनशी जोडलेली नाही आणि कायम काम करत आहे. अशा लोकांबरोबर काम न करण्याचा मी निर्णय घेतला ते योग्य झाले.

शिल्पा म्हणाली, मी मीकाला यासाठी सपोर्ट करत आहे. कारण मला वाटते की ही दादागिरी संपली पाहिजे. मी लोकांना हे सांगू इच्छित आहे की, अशा कोणताही कायदा नाही, जे आपले काम थांबवेल. मला माहित नाही की, ते आता पाकिस्तानात जाऊन परफॉर्म करेल. परंतू मी लवकरच पाकिस्तानसाठी व्हिसा अप्लाय करायला जाणार आहे. तेथे जाऊन शो देखील करणार बघू कोण आडवतंय. मी या संबंधित अत्यंत गंभीर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like