Trailer : आता महाराणीच्या भूमिकेत दिसणार शिल्पा शिंदे ! सांगितला OTT डेब्यूचा अनुभव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भाभीजी घर पर है फेम अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) आता एकता कपूरच्या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहे. डिसेंबर महिन्यात ही सीरिज रिलीज होणार आहे. पौरुषपुर (Paurashpur) असं या सीरिजचं नाव आहे. शिल्पा या सीरिजमध्ये राणी मीरावती ही भूमिका साकारणार आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना शिल्पानं आपल्या आगामी वेब सीरिजबद्दल भाष्य केलं आहे. शिल्पा म्हणाली, या वेब सीरिजमध्ये मिस्ट्री आहे. यात 7-8 एपिसोड असतील. खूपच वेगळं असेल. मी आजवर निगेटिव्ह आणि कॉमेडी असे अनेक रोल केले आहेत. पंरतु या सीरिजमधील माझा रोल खूपच वेगळा आहे. हा रोल तिच्यासाठी चॅलेंजिंग असल्याचंही शिल्पानं म्हटलं आहे. लुकवर खूप मेहनत घेतल्याचंही तिनं सांगितलं आहे.

आपल्या ओटीटी डेब्यूबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, आता ओटीटीवर सेंसरही आहे. काही गोष्टी आहेत ज्यात मी बोल्ड सीनमुळं काम केलं नव्हतं. परंतु आता ठीक आहे. आता बोल्ड सीन्स दिले आहेत, परंतु जिथं गरज आहे तिथंच. सीरिज पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की, हे सिचुएशनल आहे.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं भाभीजी घरपर है या मलिकेतून खूप लोकप्रियता मिळवली आहे. बिग बॉस 11 ची ती विनर आहे. आता लवकरच ती पौरुषपुर वेब सीरिजमधून डिजिटल डेब्यू करत आहे. ही सीरिज डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

 

You might also like