Shilpa Shinde | अभिनेत्री शिल्पा शिंदेने भडास काढत शेअर केला व्हिडिओ
पोलीसनामा ऑनलाइन : टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिला ‘अंगुरी भाभी’ या मालिकेतून जास्त प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर आता मॅडम सर या मालिकेत तिने नुकतच काम करायला सुरुवात केली होती. मात्र आता शिल्पाच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. ती म्हणजे लवकरच शिल्पा (Shilpa Shinde) या मालिकेतून बाहेर पडणार आहे. शिल्पाने मालिकेतून बाहेर पडत निर्मात्यांवर अनेक आरोप केले आहेत.
एका महिन्यापूर्वी शिल्पाने या मालिकेत काम करायला सुरुवात केले होते. मालिका सोडत तिने सांगितले की या मालिकेतील दोन महिला अभिनेत्रींबरोबर माझे काही पटत नसल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. तर याच मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री गुलकी जोशीला या संदर्भात विचारले असता ती म्हणाली की, “प्रेक्षकच या संदर्भात योग्य निर्णय घेतील. कोण मालिकेसाठी योग्य आहे आणि कोण नाही. आपण आपल्या मालिकेत प्रामाणिक नसता तर तीन वर्षापासून ही मालिका सुरु नसती”.
आता शिल्पाने (Shilpa Shinde) तिच्या instagram अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर करत गुलकी जोशी यांना प्रत्युत्तर दिले आहे. सध्या शिल्पाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यावेळी शिल्पाने म्हटले की, “मॅडम सर या मालिकेतील अभिनेत्रींचे मेंदू हे गुडघ्यात आहे. ते नक्की काय बोलतात ते त्यांना माहित नाही. पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी बद्दल बोलणारे हे महान व्यक्ती एक महिला म्हणून या मालिकेत काम करतात. काम करत उड्या मारतात आणि नको त्या गोष्टी बोलत असतात. फॅन्स ही गोष्ट काय असते हे त्यांना माहित नाही. कदाचित त्यांना हे समजले असेल त्यांची महिनाभराची कमाई ही माझी केवळ एका दिवसाची कमाई आहे. त्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप माझ्यावर करत आहेत.”
Web Title :- Shilpa Shinde | shilpa shinde angry on madam sit tv serial producer
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update