शिल्पा शिंदेची सिद्धार्थ शुक्लाला ‘धमकी’ ! म्हणाली- ‘माझ्याकडे पुरावे आहेत मला तोंड उघडायला लावू नकोस’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एक्स बिग बॉस विनर शिल्पा शिंदेनं बिग बॉस 13 चा विनर सिद्धार्थ शुक्लावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. शिल्पानं सांगितलं की, तिचं आणि सिद्धार्थचं अफेअर होतं. सिद्धार्थ तिला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा. सिद्धार्थनं तिला अ‍ॅसिड फेकण्याचीही धमकी दिली होती. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर सिद्धार्थनं शिल्पाच्या आरोपांना काहीच उत्तर दिलं नाही. त्यानी यावर कधीच खुलून भाष्य केलं नाही.

यानंतर आता शिल्पा शिंदेचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ शिल्पानं सिद्धार्थचा समाचार घेतला आहे. तिनं सिद्धार्थला धमकीही दिली आहे. व्हिडीओत बोलताना शिल्पा आधी तर मीडियावरच भडकली. यानंतर तिनं सिद्धार्थवर निशाणा साधला. शिल्पा म्हणाली, “तुला माहिती नसेल तर तुझ्या पीआरला इन्फॉर्म कर. कारण ते म्हणत आहेत की, मी खोट बोलत आहे.”

पुढे बोलताना शिल्पा म्हणाली, “जर हेच बोललं जात असेल की, मी खोटं बोलत आहे तर जी क्लीप माझ्याकडे आहे ती माझ्या आयुष्यातील 5 किंवा 10 टक्के आहे. जर मी 100 टक्के बाहेर काढलं तर… तुला वाटत असेल की, तू माझ्याकडे बोट दाखवू शकतोस मी खोट बोलत आहे असं सांगू शकतोस तर असं अजिबात नाही चालणार.”

शिल्पा म्हणाली, “सर्वंना माझा अनुभव आहे. मला काहीही सांगण्याची गरज नाही. सो प्लीज तू काळजी घे. माझ्याकडे तुझ्याविरोधात अनेक पुरावे आहेत. माझ्याकडे बिल्डींगचं सीसीटीव्ही फूटेज आहे. त्या अवस्थेत कोणत्या लोकांनी मला मदत केली होती त्यांचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहेत. तू फोन करून कोणाला शिव्या दिल्या होत्यास तेही माझ्याकडे आहे. त्यामुळे काळजी घे. मला तोंड उघडायला लावू नकोस.”

शिल्पा सिद्धार्थला आव्हान देत म्हणाली, “ज्या दिवशी माझी सटकेल ना त्या दिवशी बघ. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी सांगत आहे काळजी घे.”