‘गंमत’ म्हणून केलं ‘TikTok’, झगमगाटीनंतर शिल्पा ठाकरे आता चित्रपटामध्ये (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या टिकटॉक, लाईक आणि यूट्यूब या माध्यमांचा वापर लोक खूप करत आहे. नवीन नवीन व्हिडिओ काढून लोक शेअर करत आहे त्यांच्या या व्हिडिओला हजारो लाइक आणि कमेंट ही येतात. हे व्हिडिओ देशभरात फिरतात. सर्व लोकांना हे पहायला मिळतात. या माध्यमांचा वापर करुन एक शिल्पा ठाकरे नावाची मुलगी सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय झाली आहे.

View this post on Instagram

🖤 ReAl Is RaRe 🖤 . . . pc @zeal.design

A post shared by shilpa Thakre (@shilpa_thakre_official) on

टिकटॉकवरील तिचे व्हिडिओ अत्यंत व्हायरल होत आहे. तिच्या एक्सप्रेशनवर लोक फिदा झाले आहे. चाहते तिच्या नव्या व्हिडिओची वाट पाहत असतात.

याच टिकटॉकमुळे शिल्पाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. तिचा ‘खिचिक’, ‘ट्रिपल सीट’ आणि ‘भिरकीत’ हे ३ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. हे चित्रपट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

जाणून घेऊया शिल्पाची सविस्तर माहिती….

शिल्पा ठाकरे मुळची नागपूरमधील एका गावात राहणारी मुलगी आहे. ती एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे तिने २ वर्षे पुण्यात टेक महिंद्र कंपनीमध्ये काम केले आहे. गावातून पुण्यात आलेली शिल्पा रात्री कामाची शिफ्ट आणि दिवसा जिथे चित्रपटाची ऑडिशन असेल तिथे जायची. अखेर तिच्या कष्टाला यश मिळाले आणि तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

View this post on Instagram

होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा😍😘 | लाल पैठणी रंग माझ्या चोळीला | एक होता विदूषक | जब्बार पटेल | निळू फुले |लक्ष्मीकांत बेरडे | मधू कांबीकर | वर्षा उसगावकर | शिल्पा ठाकरे | The film won several awards and was adjudged as the Best Film[at Maharashtra State Film Awards(1993). It also won two National Film Awards at the 40th National Film Awards (1992); Best Feature Film in Marathi and Best Choreography for Laxmibai Kolhapurkar. Kolhapurkar became the first choreographer and the first woman to win the National Film Award for choreography. The film also participated at the Indian Panorama, International Film Festival of India in 1993.

A post shared by shilpa Thakre (@shilpa_thakre_official) on

View this post on Instagram

उच्चार सीताराम असला तरी रामा शिवाय सीता अपूर्ण, राधाकृष्ण बोललो तरी कृष्णा शिवाय राधा ही कशी होईल पूर्ण, गुणगान 'ती' चे गायले तरी तुम्हीच सांगा 'ती' आहे का त्याचा शिवाय परिपूर्ण, आज दिवस 'ती' चा असला तरी 'त्या' सर्वांना ही शुभेच्छा ज्यांनी 'ती' चा सन्मान राखला. – अवधुत महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

A post shared by shilpa Thakre (@shilpa_thakre_official) on

शिल्पा म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड आणि एक गंमत म्हणून केलेल्या व्हिडीओमुळे मिळालेली प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरीही माझी मेहनत आणि प्रेक्षकांचे एका वेगळ्या कलाकृतीला दिलेले प्रेम हे नक्कीच महत्वाचे आहे . मला मिळालेल्या संधीचा मी खूप आदर करते आणि यापुढेही युट्युब , नाटक , सिनेमा , वेबसीरिज च्या माध्यमाने प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करत राहीन .” तिच्या या प्रवासाबद्दल शिल्पाला विचारले असता ती सांगितले ” नागपूर ते पुणे आणि नंतर मुंबई चा प्रवास हा खरच खूप मेहनतीचा आणि कष्टाचा होता.

 

You might also like