काय सांगता ! होय, चक्क समोस्यात सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कॅन्टीनमधील खळबळजनक घटना

शिमला : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. त्यात पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र कोरोना विरुद्धच्या लढाईत काम करत आहेत. अशात शिमला येथील डॉक्टरांच्या कँटीनमध्ये समोस्यात साबणाची वडी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

समोसा खाताना वेगळीच चव लागल्याने समोस्याच्या आतमध्ये पाहण्यात आलं. त्यावेळी समोस्यात डॉक्टरांना साबणाची वडी सापडली. तेव्हा ही धक्कादायक गोष्ट समोर आली. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी सुद्धा याच कॅंटीनमधील जेवणात झुरळ सापडलेले. मिळालेल्या माहितीनुसार, आयजीएमसीच्या कॅंटीनमध्ये डॉक्टरांचा एक ग्रुप सामोसे खात बसलेला. तेव्हा त्यांना समोसा खाताना साबणाची चव लागली.

समोसा उघडून पाहिल्यानंतर त्यात साबणाची अर्धी वडी निघाली. यासंदर्भात डॉक्टरांनी आयजीएमसीच्या मेडिकल सुपरिंटेंडेंट कडे तक्रार दिली आहे. तसेच ही पहिली वेळ नसून अनेकवेळा जेवण निष्कृष्ट दर्जाचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर तक्रार करुनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली. याबाबत एका हिंदी वृत्तमाध्यमाने वृत्त दिलं आहे.