Shinde Fadnavis Government | भाजपाच्या 12 महिला आमदार पण ’या’ तिघी मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Government) मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने सरकारवर महिलाविरोधी म्हणून टीका होत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), मनसे (MNS) नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनीही यावरुन सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र सोडले आहे. महिला आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) डावलण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू आहे. (Shinde Fadnavis Government)

 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्‍या टप्प्यात म्हणजे पावसाळी अधिवेशनानंतर (Monsoon Session) होणार्‍या विस्तारात महिलांना मंत्रिमंडळात संधी मिळेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे. यामुळे राज्य सरकारमध्ये (Maharashtra State Government) कोणत्या महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार याविषयी चाचणी चर्चा सुरू झाली आहे.

 

भाजपात (BJP) 105 पैकी 12 महिला आमदार आहेत. या 12 पैकी कोणत्या महिला आमदारांना मंत्रीपद मिळणार याची चर्चा सुरू असून 3 महिला आमदारांनी नावे समोर आली आहेत. नाशिकमधील 2 आणि पुण्यातील एका महिला आमदारांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. नाशिकच्या देवयानी फरांदे (Devyani Farande) यांचेही नाव चर्चेत आहे. (Shinde Fadnavis Government)

 

नाशिकच्या भाजप नेत्या आमदार सीमा हिरे (Seema Hire) यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. त्यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. पुण्याच्या पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या सुद्धा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाच्या दावेदार मानल्या जातात. त्या सलग तीन वर्ष निवडून आल्या आहेत.

 

तसेच शिंदे गटाकडून (Shinde Group) कोणत्या महिला आमदारांना संधी मिळेल याबाबत सुद्धा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांची निवड झाल्यास सरकारला पुन्हा मोठ्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे. उर्वरीत 3 महिला आमदारांपैकी कोणाला संधी मिळेल लवकरच समजणार आहे. (Shinde Fadnavis Government)

 

भाजपच्या महिला आमदार

1. मंदा म्हात्रे (Manda Mhatre) – बेलापूर
2. मनिषा चौधरी (Manisha Chaudhary) – दहिसर
3. विद्या ठाकूर (Vidya Thakur) – गोरेगाव
4. भारती लव्हेकर (, Bharti Lovekar) – वर्सोवा
5. माधुरी मिसाळ – पर्वती
6. मुक्ता टिळक (Mukta Tilak) – कसबापेठ
7. देवयानी फरांदे – नाशिक मध्य
8. सीमा हिरे – नाशिक पश्चिम
9. श्वेता महाले (Shweta Mahale) – चिखली
10. मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) – जिंतूर
11. नमिता मुंदडा (Namita Mundada) – केज
12. मोनिका राजळे (Monica Rajle) – शेवगाव शिवसेनेच्या महिला आमदार

 

शिंदे गटाच्या आमदार

1. यामिनी जाधव (Yamini Jadhav) – भायखळा
2. लता सोनवणे (Lata Sonavane) – चोपडा
3. मंजुळा गावित (Manjula Gavit), अपक्ष – साक्री मतदारसंघ, धुळे
4. गीता जैन (Gita Jain), अपक्ष – मीरा-भाईंदर मतदारसंघ, ठाणे

 

Web Title :- Shinde Fadnavis Government | a total of 12 women mlas of bjp these three are considered strong contenders for the position of minister in shinde fadanvis sarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा