Shinde Fadnavis Government Cabinet | एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये या दिग्गजांची लागू शकते वर्णी, जाणून घ्या यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shinde Fadnavis Government Cabinet | मुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौर्‍यात राज्याचे मंत्रिमंडळ स्पष्ट होईल असे वाटत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आषाढी नंतर मंत्रिमंडळ ठरवले जाईल असे सांगितले होते. परंतु उद्या 11 जुलैला सुप्रीम कोर्टात 16 आमदारांची अपात्रता आणि सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांच्या व्हिपवरुन सुनावणी आहे. या निर्णयानंतर शिंदे – फडणवीस हे 12 किंवा 13 जुलैला मंत्रिमंडळ जाहीर करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. (Shinde Fadnavis Government Cabinet)

 

सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात भाजपचे 8 आणि शिंदे गटाचे 5 जण असा 13 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण मंत्रिमंडळ स्थापनेवरून शिंदे गटात कुरबुरी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या टप्प्यातील संभाव्य मंत्री कोण असतील, याची एक यादी आपण जाणून घेणार आहोत. (Shinde Fadnavis Government Cabinet)

 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते. त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे दिली जाईल. चंद्रकांत पाटील हे राज्याचे माजी महसूल मंत्री आहेत. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनाही मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. ते 2014 ते 2019 मध्ये अर्थमंत्री होते. तसेच गिरीश महाजनही (Girish Mahajan) कॅबिनेट मंत्री होऊ शकतात. ते माजी जलसंपदा मंत्री आहेत. पहिल्या टप्प्यात आशिष शेलारांनाही (Ashish Shelar) मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू शकते. ते माजी शालेय शिक्षण मंत्री आहेत.

 

चंद्रकांत पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाचे मंत्रिपद दिले तर त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्याला देण्याचा विचार भाजप करू शकते. यासाठी भाजपामध्ये चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे नाव चर्चेत आहे. फडणवीस सरकारमध्ये बावनकुळे ऊर्जा मंत्री होते.

 

शिंदे गटाकडून यांना मिळू शकते पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची संधी

महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) पाणीपुरवठा मंत्री असलेले गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात शपथ घेऊ शकतात. दादा भूसेही (Dada Bhuse) कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भूसे हे माजी कृषी मंत्री आहेत. शंभूराज देसाईंचाही (Shambhuraj Desai) कॅबिनेट मंत्री म्हणून नंबर लागू शकतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते.

 

उदय सामंतही (Uday Samant) पहिल्याच टप्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
ते मविआ सरकारमध्ये उच्च तंत्रशिक्षण मंत्री होते. प्रहार संघटनेचे बच्चू कडूही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू (Bacchu Kadu) शिक्षण राज्यमंत्री होते.

 

भाजपाला 25 ते 27 तर शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदे मिळू शकतात. 4 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद असे सूत्र असल्याचे समजते.
दिल्लीत झालेल्या चर्चेनुसार, गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा,
पाणीपुरवठा ही खाती भाजपाला मिळू शकतात.

 

शिंदे गटाला नगरविकास, उद्योग, ग्रामविकास, कृषी, परिवहन, पर्यावरण ही खाती मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपद शिंदे गटाला दिल्याने भाजपाचा खाते वाटपात जास्त वाटा असणार आहे.

 

Web Title :- Shinde Fadnavis Government Cabinet | cm eknath shinde devendra fadnavis cabinet who is the minister after ashadhi the first list of potential ministers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा