Shinde Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! पुण्यातील गंभीर प्रकरणासह राज्यातील ‘या’ 2 केसेस CBI कडे वर्ग करण्याचे निर्देश?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. शिंदे सरकारने (Shinde Fadnavis Government) महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. तसेच काही ठिकाणचा निधीही रोखला आहे. यानंतर आता आणखी एक महत्त्वाचा मोठा निर्णय शिंदे सरकारने (Shinde Fadnavis Government) घेतला आहे. राज्यातील दोन महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समजतेय.

 

राज्यात सत्तांतर होताच आघाडी सरकारच्या कार्यकाळात दाखल झालेल्या गुन्हे केंद्रीय यंत्रणांकडे वर्ग केले जात आहेत. आता राज्यातील आणखी दोन महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या गृह विभागाने (Home Department) पोलिसांना दिले असल्याची माहिती समजतेय.. (Shinde Fadnavis Government)

 

कोणती आहेत ती प्रकरण?

1. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांच्यासह 28 जणांवर खंडणी (Extortion) आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा (FIR) दाखल आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या 29 आरोपींनी पुणे पोलिसांवर (Pune Police) केलेल्या आरोपांची चौकशीही सीबीआय करणार असल्याची माहिती समजतेय.

 

तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अधिवेशन मध्ये गाजलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb) गिरीश महाजन यांच्यावर दाखल गुन्ह्यातील वास्तव उघड करणारा होता. या खळबळजनक प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी येत्या दिवसात होणार असल्याचे बोललं जात आहे. तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Advocate Praveen Chavan), काही पोलीस अधिकारी (Police Officer) आणि काही बडे राजकीय नेते आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा खरा की खोटा? याचाही तपास होणार असल्याची माहिती समजतेय. तपासात हा गुन्हा खोटा असल्याचं निष्पन्न झालं तर फिर्यादी अडचणीत येतील.

 

2. फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी (Phone Tapping Report Leak Case)
मुंबई पोलिसांत (Mumbai Police) दाखल गुन्ह्याचा तपासही सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.
तपास हस्तांतरित करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. हस्तांतरण प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.
सीबीआयनं होकार दिल्यानंतर केस पेपर हस्तांतरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फोन टॅपिंग प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याच्या निर्णयामुळे रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मानला जात आहे.

 

Web Title :- Shinde Fadnavis Government | eknath shinde devendra fadnavis government orders police to hand over 2 important cases in state to cbi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | खरी शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

 

Pune Rape Case | धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन बलात्कार; कर्वे रोडवरुन चाकणला नेऊन केला अत्याचार

 

Pune Crime | पती-पत्नीच्या वादात ‘डिलिव्हरी’ बॉयवर गुन्हा दाखल; जबरदस्तीने पार्सल देण्याचा केला प्रयत्न