Shinde- Fadnavis Government | सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Shinde- Fadnavis Government | शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केले आहे. (Shinde- Fadnavis Government)

 

शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरळसेवेने शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या गट-अ, ब, क व ड (वर्ग 1-4) या पदांसाठीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शासनाने 75 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. हि प्रक्रिया सुरु असताना लोकप्रतिनिधींकडून अनेक निवेदने देण्यात आली आहेत. या निवेदनांचा विचार करून आणि कोरोना विषाणू संकट अशा कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परिक्षेत बसण्याची संधी प्राप्त करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Shinde- Fadnavis Government)

 

त्यामुळे आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासन सेवेत सरळसेवेने नियुक्ती देण्यासाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता दिली जाणार आहे.
समजा तर खुल्या प्रवर्गासाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असेल तर ती 40 वर्षे ग्राह्य धरली जाणार आहे
व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे असेल तर ती 45 वर्षे ग्राह्य धरली जाणार आहे.
या निर्णयामुळे आता ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

 

Web Title :- Shinde- Fadnavis Government | increase in age limit for direct service recruitment in government jobs in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandeep Deshpande | संदीप देशपांडेवरील हल्लाप्रकरणी दोन जणांना अटक; भांडुपमधून केली अटक

NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले