Shinde-Fadnavis Government | दिवाळी संपताच शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा करणार मोठे प्रशासकीय फेरबदल

मुंबई : दिवाळी (Diwali Festival) संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) पुन्हा मोठे प्रशासकीय फेरबदल करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधान सचिव (Principal Secretary), अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary), राज्यातील मोठ्या महापालिकांचे आयुक्त (Municipal Commissioner), जिल्हाधिकारी (Collector) पदांवर मोठे फेरबदल होणार आहेत. सोबतच मंत्रालयातील महसूल, गृह, वित्त, सार्वाजानिक बांधकाम विभागाचे सचिव दर्जाचे अधिकारी यांच्याही बदल्या होण्याची शक्यता आहे. (Shinde-Fadnavis Government)

या प्रशासकीय फेरबदलात पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, अकोला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांसह (IAS Officer) राज्यातील पोलीस प्रशासनात (Police Administration) मोठे फेरबदल केले जातील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ADG, पोलीस आयुक्त (Police Commissioner), आयजी (IG) पदावर मोठे फेरबदल होणार आहेत. पुढील काही दिवसातच हे मोठे फेरबदल होतील. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात प्रमुख चर्चा झाली आहे. दिवाळीपूर्वीही शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मोठे फेरबदल केले होते.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या होणार अशी चर्चा रंगली होती.
याबाबत गृह मंत्रालयाने (Home Ministry) 20 ऑक्टोबर रोजी अचानक आदेश काढले.
यावेळी पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले.
राज्यातील 23 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या आणि राज्य पोलीस सेवेतील दोन अशा 25 अधिकार्‍यांच्या नवीन बदल्या करण्यात आल्या होत्या.
या बदल्यांवरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात मतभेद झाल्याचीही चर्चा होती.

Advt.

Web Title :- Shinde-Fadnavis Government | major administrative changes in maharashtra police shinde-fadnavis government again

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेचे मोठे वक्तव्य, म्हणाली – ‘बॉलिवूडमध्ये महिलांना…’

Kantara Movie | ‘कांतारा’ पाहून रजनीकांत यांच्या अंगावर आला काटा! चित्रपटासाठी लिहिली भावूक पोस्ट