Shinde Fadnavis Government | अमित ठाकरे यांना मंत्रीपदाची ऑफर ? राज ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shinde Fadnavis Government | शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजपा नेते (BJP Leader) सतत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बंडखोरीनंतर पक्षाला उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांसह माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सर्वत्र दौरा करत असून सतत चर्चेत आहेत. आता शिंदे गट आणि भाजपाने ठाकरे विरूद्ध ठाकरेचा नवा डाव टाकल्याची चर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना मंत्री करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. (Shinde Fadnavis Government)

 

सध्या आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढली असून ते ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे कोकण दौर्‍यावर आहेत. त्यांचा हा दौरा सुरु असताना ते शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्री होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, अमित ठाकरे यांच्या मंत्रीपदाबाबत मनसेकडून तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आली आहे. (Shinde Fadnavis Government)

अमित ठाकरे यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी माहिती समोर आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत माहिती देताना,
असे काही नाही, असे सांगून यावर पडदा टाकला आहे.
उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत ठरावात भाजपला मदत करावे, असे आवाहन केले होते.
त्यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता. त्यानंतर भाजपच्या बाजुने मनसेने मतदान केले.
त्यामुळे भाजप आपल्या कोट्यातून मनसेला एक मंत्रिपद देईल, अशी जोरदार चर्चा सुरु होती.

 

आता भाजपने मनसेला नवी ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र, आज राज ठाकरे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

 

Web Title :- Shinde Fadnavis Government | will amit thackeray become a minister in cm eknath shindes government raj thackeray first reaction

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा