Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री कोण ? नाव ठरलं ?

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन –  Shinde-Fadnavis Govt | महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप दोन दिवसात होणार असल्याची चर्चा आहे. भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अनुभव बघता भाजप सरकारमध्ये त्यांना महसूल किंवा सहकार मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मराठवाड्यातील भाजपा नेते पाशा पटेल यांनी या सदंर्भात केलेल्या एका सूचक वक्तव्याने विखे पाटलांना ’अर्थ’ खाते मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Shinde-Fadnavis Govt)

 

कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले राधाकृष्ण विखे-पाटील यांचा त्यांच्या लोणी गावात भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पाशा पटेल यांनी राज्याच्या तिजोरीची किल्ली आता विखे-पाटील यांच्याकडे आल्याचे वक्तव्य केले. या सत्कार समारंभासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. (Shinde-Fadnavis Govt)

 

पाशा पटेल यांनी केलेल्या सूचक वक्तव्याचा नेमका ’अर्थ’ काय ? याबद्दल वेगवेगळे तर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.
राज्य सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांना महसूल किंवा अर्थ खाते मिळणार असल्याचे संकेत आहेत.
याआधी विखे पाटलांनी शालेय शिक्षण, विधी व न्याय, जलसंधारण, परिवहन, कृषी व पणन, गृहनिर्माण अशी महत्त्वाची मंत्रिपद भूषवली आहेत.

 

अनुभवी असलेल्या विखे पाटील यांना भाजप सरकारमध्ये महसूल किंवा सहकार मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मात्र पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने राधाकृष्ण विखे पाटलांना ’अर्थ’ खाते मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
यामुळे राजकीय नेते आणि त्यांच्या समर्थकांचे लक्ष खातेवाटपाकडे लागले आहे.

 

Web Title : –  Shinde-Fadnavis Govt | radhakrishna vikhe patil might get finance portfolio in shinde government bjp leader pasha patel gives hint

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा