Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Shinde-Fadnavis Govt | साधारणपणे चार महिन्यापूर्वी झालेल्या राजकीय धुमाकुळीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केला आणि स्वतः बरोबर ४० आमदार आणि १२ खासदार घेत भाजपबरोबर युती केली. त्यानंतर महाराष्ट्रात बरेच दिवस फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा राज्य कारभार चालवत होते. पण काही दिवसांनी महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळाले. आता, येत्या हिवाळी अधिवेशनाआधी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार आशिष जैसवाल यांनी दिली आहे. (Shinde-Fadnavis Govt)

भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना सध्याच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक आमदार या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहे. विशेषतः शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मंत्रिपदाच्या आशेवर उद्धव ठाकरे गट सोडला होता, पण ते न मिळाल्याने ते हिरमुसले होते. त्यामुळे आता त्यांना संधी मिळेल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल. (Shinde-Fadnavis Govt)

त्यातच उद्धव ठाकरे गटाकडून सरकार अस्थिर असल्याची चर्चा आणि विधाने सातत्याने होत असतात.
आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आज पुन्हा त्याचा पुनः उच्चार केला आहे.
२०२३ पर्यंत महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागतील अशी चर्चा सातत्याने संजय राऊत आणि टीम करत आहे.

Web Title :- Shinde-Fadnavis Govt | shinde fadnavis government cabinet expansion expected before assembly session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Assembly Elections 2022-2023 | सन 2022-23 मध्ये तब्बल 11 राज्यांमध्ये निवडणुका, जाणून घ्या इलेक्शन जिंकण्यासाठीचे मोदींचे मिशन

Sandeep Khardekar | सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव ही पुणे मनपातील भाजपाच्या भावी यशाची नांदी – संदीप खर्डेकर