Shinde Government Expansion | शिंदे सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे सरकारला कैचीत पकडण्यासाठी विरोधकांचा आवडता मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार (Shinde Government Expansion). त्यामुळे शिंदे सरकारला अनेकदा विरोधकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. येत्या 19 डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार (Shinde Government Expansion) होणार होता. तशी चर्चा मागील काही काळ होती. पण हा मंत्रिमंडळ विस्तार आता लांबणीवर पडणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस हिवाळी अधिवेशनानंतर उजाडणार आहे.

हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती सोय केली आहे. राज्यातील काही खाती शिंदे गटातील मंत्र्यांना देण्यात आली आहेत. सध्या राज्यातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह 20 मंत्री आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिरिक्त खात्यांचा भार आहे. यात एकनाथ शिंदे गटाच्या 9, तर भाजपच्या 9 मंत्र्यांकडे कारभार दिला गेला आहे. राज्यातील महत्त्वाच्या खात्यांना अद्याप मंत्री नाहीत, अशी तक्रार विरोधी पक्ष करत आहेत. तसेच एकाच मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती असल्याने कामात अडथळे येतात, असेदेखील विरोधकांचे मत आहे.

शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या आशेने बंडात सामील झाले होते.
त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात (Shinde Government Expansion) संधी न मिळाल्याने ते
नाराज आहेत. तसेच मंत्रिपदावरून सध्या धुसफूस सुरू आहे. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराकडे आमदारांचे लक्ष लागले होते.

Web Title :-Shinde Government Expansion | maharashtra politics expansion of the state cabinet portfolio after the winter session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई