Shinde Government | वादग्रस्त महिला पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत, मविआच्या काळात लाच प्रकरणात झाले होते निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) घेतले निर्णय बदलण्याचा धडाका लावला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai CP Parambir Singh) यांच्यासोबत निलंबित (Suspended) केलेले पोलीस उपायुक्त पराग मणेरे (DCP Parag Manere) यांचे निलंबन (Suspension) रद्द करण्यात करुन मविआला दणका दिला आहे. यानंतर वादग्रस्त महिला पोलीस अधिकारी सुजाता पाटील (ACP Sujata Patil) यांचे निलंबन रद्द करुन त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने (Shinde Government) घेतला आहे.

 

सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाच घेतल्याप्रकरणी (Accepting Bribe) महाविकास आघाडी सरकारने निलंबित केले होते. अप्पर मुख्य सचिव गृह विभाग (Additional Chief Secretary Home Department) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर सेवेत पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी (Meghwadi Police Station) आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्याचा (Jogeshwari Police Station) चार्ज होता.

 

सुजाता पाटील या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्या होत्या. सुजाता पाटील
यांनी हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहून आत्महत्या आणि
राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात एकच खळबळ उडाली होती.

मविआच्या काळात वादात अडकलेल्या चार अधिकाऱ्यांना शिंदे सरकारडून (Shinde Government) क्लीन चीट दिली असल्याचं समोर आलं आहे.
नुकतंच या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेत असल्याचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत.
यामध्ये पोलीस उपायुक्त पराग मणेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल (Sub Divisional Police Officer Rajendra Pal),
अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील (Additional Superintendent of Police Dheeraj Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांचा समावेश आहे.

 

Web Title :- Shinde Government | maharashtra female police officer sujata patil back in service suspended for bribery during mahavikas aghadi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार, ‘या’ भागात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

 

Osmanabad ACB Trap | अटक न करण्यासाठी 20 हजाराची लाच घेताना पोलीस एसीबीच्या ताब्यात

 

Shivsena MP Sanjay Raut | राऊतांच्या घरात सापडली डायरी, कोट्यावधींचा हिशोब कोडिंगमध्ये, राऊतांच्या अडचणीत वाढ?