×
Homeताज्या बातम्याShinde Group | नाशिकमध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या गटात राडा, महिला शिवसैनिकांनी शिंदे...

Shinde Group | नाशिकमध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या गटात राडा, महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला भर रस्त्यात दिला चोप; छेड काढल्याचा आरोप

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – दसऱ्यानिमित्त मुंबईत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) मेळावे होणार आहेत. आपापले मेळावे (Dasara Melava) यशस्वी करण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, या मेळाव्यासाठी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना आणि शिंदे गटामध्ये (Shinde Group) नाशिकमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. महिलांची छेड काढल्याचा दावा करत शिवसेनेच्या रणरागिणींनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला भर रस्त्यात चोप दिला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे येत आहेत. दरम्यान, नाशिक येथून शिंदे गटाचे शिवसैनिक (Shiv Sainik) मुंबईकडे येत असताना त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना डिवचले.
यावेळी शिंदे गटातील शिवसैनिकांपैकी काही शिवसैनिकांनी महिलांकडे पाहून काही हातवारे केल्याचा आरोप महिला शिवसैनिकांनी केला.

त्यानंतर शिवसैनिकांनी गाड्या अडवून शिंदे गटातील शिवसैनिकांशी वाद घातला.
तसेच या कार्यकर्त्यांना गाडीतून बाहेर ओढत त्यांना मारहाण केली.
या घटनेचे चित्रिकरण देखील करण्यात आले असून, त्यामध्ये गाडीतील शिवसैनिक या महिला शिवसैनिकांची माफी
मागताना दिसत आहेत. मारहाण झालेले शिंदे समर्थक हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची शक्यता आहे.

Web Title :- Shinde Group | nashik uddhav thackeray shivsena women party wokers beats cm eknath shinde supporters near shahpur video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mukesh Ambani | मुकेश अंबानी आणि नीता अंबांनी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, पोलिसांचा लाठीचार्ज

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News