पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shinde Paar Chowk Pune Crime News | शिंदेपार चौकातील अष्टभुजा देवीच्या मंदिराची (Ashtabhuja Devi Mandir) खिडकी तोडून त्याद्वारे आत प्रवेश करुन चोरट्यांनी मंदिरातील स्टीलची दान पेटी चोरुन नेली.
याबाबत निलेश शशिकांत खडके (वय ४०, रा. शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी पहाटे अडीच ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल शनिवार नवरात्र उत्सव मंडळाचे (Akhil Shaniwar Navratri Festival Mandal) शिंदेपार चौकात अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. रविवारी सकाळी मंदिराची खिडकी तुटलेली दिसल्याने भाविकांनी खडके यांना कळविले. त्यांनी जाऊन पाहिले असता चोरट्यांनी मंदिराची खिडकी तोडून त्याद्वारे मंदिरात प्रवेश केला. देवीसमोरील १५ हजार रुपयांची स्टीलची दान पेटी व त्यातील रोख रक्कम चोरुन नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घोडके, पोलीस उपनिरीक्षक फरताडे यांनी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Puja Khedkar | पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा; IAS पद परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा