बाजारात फळे खरेदी करताना घ्या ‘ही’ खबरदारी

पोलीसनामा ऑनलाइन – बाजारात फळे खरेदी करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. चमकदार फळे चांगली असतातच असे नाही. उलट कधीकधी ही फळे शरीराला घातक ठरू शकतात. फळे चमकदार दिसावाती म्हणून घातक केमिकल्सचा वापर केला जातो. ही रसायने आरोग्यासोबतच लिव्हरसाठीही अत्यंत धोकादायक असतात. यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

रसायने वापरून पॉलिश केलेली फळे एवढी चमकदार असतात की त्यांच्या पुढे ताजी फळेही फिकी पडतात. फळे चमकदार दिसण्यसाठी वार्निशसारख्या रसायनांचा वापर केला जातो. तसेच मेणाचा वापर करूनही फळांची चमक वाढविली जाते. कार्बाइड पावडरचाही वापर केला जातो. अशी फळे खाण्यात आली तर शरीरामध्ये टॉक्सिन्सची मात्रा वाढून लिव्हर, कीडण्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. चमकदार दिसणाऱ्या फळांमध्ये सर्वात जास्त समावेश हा द्राक्ष आणि सफरचंदाचा असतो. व्यापारी यांवर सर्वाधिक रसायनांचा समावेश करतात. फळांमध्ये जेवढा वेळ ओलावा टिकतो तोपर्यंत ती ताजी दिसतात.

त्यामुळे दुकानदारांकडून फळांवर मेणाचा थर चढवण्यात येते. ज्यामुळे फळांचे पोर्स बंद होतात आणि त्यातील ओलावा बाहेर पडत नाही. लवकर खराब होणाऱ्या फळांवर देखील अशीच प्रक्रिया करण्यात येते. प्रामुख्याने द्राक्ष आणि सफरचंदाचा समावेश असतो. फळांचे सेवनाने व्हिटामिन आणि मिनरल्सची कमतरता पूर्ण होते. परंतु चमक वाढविण्यासाठी पॉलिश केलेली फळे विषारी ठरू शकतात. ही घातक रसायने लिव्हरमध्ये पोहोचल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे किडनी डॅमेज होण्याचा धोकाही वाढतो. फळांवर वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा थेट परिणाम लिव्हरवर होत असतो.

लिव्हर प्रभावित झाल्याने काविळ आणि आतड्यांच्या समस्यांनी त्रस्त होतात. तत्काळ उपचारांनी हे बरे होते. परंतु त्यानंतर पोटासंबंधीच्या आजारांचा धोका वाढतो. बराच वेळ अशा फळांचे सेवन केल्याने लिव्हर खराब होण्याची शक्यता वाढते. फळे खरेदी करताना जास्त चमकणारी फळं खरेदी करणे टाळावे. विशेष पॅकिंग करण्यात आलेली फळे खरेदी करणे टाळावे. सीझनल आणि सहज उपलब्ध होणारी फळे खरेदी करावीत. तसेच फळे नेहमी धुवून खावीत.