शिराढोणची अंतरराष्ट्रीय शाळा ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत बंद

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र अंतरराष्ट्रीय मंडळ बरखास्त करण्याच्या घोषणे नंतर शिराढोण येथील शिक्षणप्रेमी पालक व शालेय व्यवस्थापन समितीने अंदोलनाचे सत्र सुरु केले आहे. दि.1 मार्च रोजी
संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत या निर्णया विरोधात निषेध नोंदवला तसेच दि.05 मार्च रोजी कळंब लातूर रस्त्यावर 2 तास शाळेतील विद्यार्थ्यासह तळ ठोकत रास्तारोको अंदोलन करण्यात आले.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वकांक्षी असलेल्या या शिक्षण व्यवस्थेत अचानकपणे मंडळ बरखास्तीचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने शिक्षण मंत्र्यानी घोषणा केल्याने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत हे अंदोलन शिराढोण वासीयांनी सूरु केल आहे. दि.6 रोजी शिराढोण येथील नागरिक व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेस ताळे ठोकण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. सुरळीत सूरु असलेला सदरील अभ्यासक्रम व मंडळ बरखास्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे. या अंदोलनात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर महाजन, किरण पाटील, जनार्धन महाजन, शाम पाटील, दादा काळे, शैलेश पाटील, पिंटू जाधवर, परमेश्वर माळी यांचा सहभाग होता.