बाॅलिवुडच्या ‘या’ अभिनेत्रीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारात गुरुवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी हजेरी लावली होती. यावेळी साई भक्त शिल्पा  शेट्टी ने केवळ साई बाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले नाही तर ८०० ग्रॅम सोन्याचा मुकुट देखील अर्पण केला. या मुकुटाची किंमत जवळपास २५ लाख इतकी आहे.
 शिल्पा शेट्टीने कुटुंबासह साई दरबारी हजेरी लावली होती. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत सगळ्यांनी साईसमाधीचं मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिल्पासोबत राज कुन्द्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे उपस्थित होते. यावेळी बोलताना  सोन्याचं दान किती आहे यापेक्षा मनातील श्रद्धा आणि भाव महत्त्वाचं असल्याचं शिल्पाने सांगितलं.
शिल्पा निस्सीम  साईभक्त 
शिल्पा ही शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून वर्षातूगेल्याचा महिन्यात न किमान एकदा तरी ती साई दर्शनासाठी आवर्जून येते. शिल्पाच्या विनंतीवरुन अर्पण केलेला सुवर्ण मुकूट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधान करण्यात आला. त्यानंतर साईबाबांच्या धुपारतीतही शिल्पाने संपूर्ण परिवारासह उपस्थिती दर्शवली.
शिल्पाला  पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. साईबाबा संस्थानच्यावतीने उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी त्यांचा शाल मूर्ती देऊन सत्कार केला.
दरम्यान देशातील आणि परदेशातील अनेक दिग्ग्ज मंडळी सईंचे  भक्त आहेत. गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला . यावेळी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घर देण्यात आली होती .