Shirdi Airport | शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॅडींग सुविधा सुरू करणार – व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर

शिर्डी येथून आतापर्यंत 2 लाख किलो मालाची निर्यात, कार्गो क्षमता वाढविण्यासाठी कॉर्गो हब बांधणार

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – Shirdi Airport | शिर्डी विमानतळाहून नाईट लॅडींग विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डयन महानिदेशनालय (DGCA) ची टीम मे 2022 अखेर येथील नाईट लॅडींग सुविधेची तपासणी करणार आहे. डीजीसीएची परवानगी प्राप्त झाल्यावर शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) येथून लवकरात लवकर नाईट लॅडींग (Night Landing) सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (Maharashtra Airport Development Company) व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर (Managing Director Deepak Kapoor) यांनी आज दिली.

 

शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कपूर यांनी शिर्डी विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिर्डी विमानतळ प्रवेश व निर्गमन सुविधा, अग्न‍िशमन व्यवस्था, नाईट लॅडींग, कॉर्गो सेवा (Cargo Service), काकडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, परिसरातील स्वच्छता अशा विविधांगी प्रश्नांचा आढावा घेऊन त्यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली.

 

व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, शिर्डी विमानतळ हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे विमानतळ आहे. शिर्डी येथून आतापर्यंत 2 लाख किलो मालाची निर्यात करण्यात आली आहे. कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बंगळुरू (Bangalore), चेन्नई (Chennai) व दिल्ली (Delhi) येथे नियमित पाठण्यात येत आहे. ही सुविधा व्यापक व मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी 20 कोटी रूपये खर्च करुन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या माध्यमातून कॉर्गो हब (Cargo Hub) बांधण्यात येणार आहे.

 

काकडी गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींसोबत सखोल चर्चा करून तेथील पाण्याच्या टाकीची संपूर्णपणे डागडुजी करून
दुरुस्ती करण्यासाठी लवकरात लवकर निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्याशिवाय इतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रस्ता, शाळा,
उपाहारगृह याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. विमानतळावरील विक्रेत्यांच्या अडी-अडचणी यावेळी जाणून घेऊन त्यांच्या हिताचे योग्य ते निर्णय घेण्यात आले.
विमानतळावरील अग्न‍िशमन यंत्रणेचा (Fire System) आढावा घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली.

 

शिर्डी विमानतळावरील प्रवेश व निर्गमन ठिकाणावरील अभ्यागत आरामदायी कक्ष सुविधेविषयी व्यवस्थापकीय संचालक कपूर म्हणाले,
अभ्यागत आरामदायी कक्ष मधील यात्री- सुविधेची यावेळी सखोल पाहणी करण्यात आली.
येथे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या फरशीची तत्काळ दुरूस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

 

यावेळी शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव (Shirdi Airport Director Sushilkumar Srivastava),
टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा (Terminal Manager Murli Krishna), स्थापत्य अभियंता कौस्तुभ ससाणे
(Civil Engineer Kaustubh Sasane), मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांजणे (Chief Financial Officer Sanjay Kanjane),
अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी (Superintending Engineer Mangesh Kulkarni), अजय देसाई (Ajay Desai), कृष्णा शिंदे (Krishna Shinde) आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title :-  Shirdi Airport | Night landing facility to be launched from Shirdi Airport soon Managing Director Deepak Kapoor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Deepika Padukone Hot Look | दीपिका पादुकोननं काळ्या रंगाच्या शिमरी साडीमध्ये चाहत्यांना लावलं वेड, पाहा व्हायरल फोटो…

Soaked Dry Fruits Benefits | उन्हाळ्यात भिजलेले ड्रायफ्रुट्स खा, जाणून घ्या होणारे फायदे

Devendra Fadnavis on Thackeray Government | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची हत्या झाली’