साईबाबा जन्मस्थळ वाद : शिर्डीत ‘बेमुदत’ बंद सुरु, भाविकांचे ‘हाल’

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – साईबाबांच्या जन्मस्थळावरुन निर्माण झालेल्या वादातून शिर्डीमध्ये मध्यरात्री १२ वाजल्यापासून बेमुदत बंद सुरु करण्यात आला आहे. तेथील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद करण्यात आली आहे. शिर्डीकरांच्या या बंदला पंचक्रोशीतील गावांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दररोज साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्याचा फटका बसत आहे. अगदी चहा मिळणेही अवघड झाले आहे. अनेक भाविक रात्रभर प्रवास करुन सकाळी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत पोहचतात. त्यातील बहुतेकांना या बंदची कल्पना नव्हती. बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. साई मंदिर आणि रुग्णालय सुरु आहेत.

मराठवाड्यातील पाथरी येथील साई बाबांच्या जन्मस्थळासाठी १०० कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल अशी घोषणा मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटले. पाथरीला निधी देण्यात शिर्डीकरांचा आक्षेप नाही. परंतु साई जन्मस्थान म्हणून त्यांची ओळख निर्माण केली जाते, यावर त्यांचा आक्षेप आहे. जन्मस्थळांच्या वादामुळे बाबांच्या मुळ शिकवणीला धक्का पोहोचत असल्याने शिर्डीकरांचा जन्मस्थळाच्या दाव्याला आक्षेप आहे.

पाथरी हे साईबाबांचा जन्म झाला असल्याचा दावा पाथरीकरांचा आहे. पाथरी येथे जन्मस्थळाला मान्यता मिळाली तर शिर्डीतील भाविकांची गर्दी कमी होईल. शिर्डीचे महत्व कमी होईल व भाविकांचा ओढा शिर्डी ऐवजी पाथरीकडे जाईल. त्याचा परिणाम शिर्डीतील सर्व व्यवसायावर होईल, हे आर्थिक कारणही या वादामागे असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत जे विधान केले ते मागे घ्यावे, अशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी करुन या वादातील दाहकता आणखी वाढवली आहे.

या मुद्द्यावर सोमवारी मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे. असे असले तरी मुख्यमंत्री ठाकरे हे आपले विधान मागे घेत नाही. तोपर्यंत हा बेमुदत बंद सुरु राहणार असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !