शिर्डी मतदारसंघातील मतदानयंत्रे ‘स्ट्रॉंगरुम’मध्ये बंदिस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात ६४.५४टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षितपणे ठेवण्यात आले. याठिकाणी पोलिस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी दिनांक २३ मे रोजी होणार आहे.

आज भारत निवडणूक आयोगाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निरीक्षक वीरेंद्र सिंह बंकावत आणि निवडणूक निर्णय अधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या उपस्थितीत सीलबंद यंत्रे गोदामात ठेवण्यात आली. या परिसरात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवली जाणार आहे. गोदाम आणि परिसर सीसीटीवीच्या अखत्यारित आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी निवडणूक व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Loading...
You might also like