खा. लोखंडेंसह 11 जणांचे 19 उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज एकुण 11 जणांनी 19 नामनिर्देशनपत्र दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे त्यांनी हे अर्ज सादर केले.

आज नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे:- सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना 4 अर्ज), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी 2 अर्ज), गणपत मच्छिंद्र मोरे ( बहुजन मुक्ती पार्टी 1 अर्ज), वाकचौरे भाऊसाहेब राजाराम ( अपक्ष 2 अर्ज), कांबळे भाऊसाहेब मल्‍हारी (इंडियन नँशनल काँग्रेस 1 व अपक्ष 2), सदाशिव रामचंद्र वाकचौरे (इंडियन नँशनल काँग्रेस 1 अपक्ष 1), कु. क्रांती अरुण साबळे (वंचित बहुजन आघाडी 1 अर्ज), बन्सी भाऊराव सातपुते ( भारतीय कम्युनिसट पार्टीकडून 1 अर्ज ), डॉ. अरुण प्रभाकर साबळे (वंचित बहूजन आघाडी 1 अर्ज), प्रदिप सुनिल सरोदे (अपक्ष 1),अंबादास लक्ष्मण सरोदे ( भारतीय लोकमत राष्ट्रवादी पार्टी 1 अर्ज) दाखल केला आहे. तसेच 16 जणांनी 27 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.

16 व्यक्तींनी नेले 27 अर्ज
आज नामनिर्देशनपत्र नेलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे; (कंसात अर्जांची संख्या):- 1. विकास गोविंदराव खाजेकर, अशोकनगर, ता. श्रीरामपूर यांनी विजयराव गोविंदराव खाजेकर यांच्यासाठी (2) व विलास गोविंदराव खाजेकर यांच्यासाठी (1), 2. रामनाथ कारभारी बो-हाडे, कासारे, ता. संगमनेर यांनी (2), 3. प्रदिप सुनिल सरोदे , शिर्डी, ता. राहाता यांनी ॲड. रत्नाकर लहुकांत मधाडे (1), 4.अशोक जगदीश जाधव, नाशिक रोड, नाशिक (2) 5. सुरेश एकनाथ जगधने, श्रीरामपूर (3), 6. अशोक अनाजी वाकचौरे, जोर्वे, ता. संगमनेर (2), 7. दिपक भानुदास गायकवाड, निमगांव वाघा, ता. नगर यांनी ॲङ संतोष भानुदास गायकवाड यांच्यासाठी (2), 8. प्रशांत विनोद कसबे, भेर्डोपूर, ता. श्रीरामपूर (1), 9. क्रांती अरुण साबळे, लोणी बु, ता. राहाता (3), 10. दिपक भोलेनाथ कांबळे, रामवाडी, सर्जेपूरा, नगर यांनी सुभाष दादा त्रिभुवन यांच्यासाठी (1), शिमोन ठकाजी जगताप, निमगांव को-हाळे, ता. राहाता यांनी भाऊराव सयाजी लोहाळे (1), 11. भाऊसाहेब विनायक वाकचौरे, मंगळापूर, ता. संगमनेर यांनी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्यासाठी (1), 12. योगेश वसंत थोरात, केडगांव, नगर यांनी संजय लक्ष्मण सुकदान (1), 13. रामेश्वर केरु भोसले, चनेगांव, ता. संगमनेर (1), 14. संपत खंडू समिंदर, श्रीरामपूर (2), बन्सी भाऊराव सातपुते, नेवासा (1) अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेकडुन देण्यात आली आहे.