Shirdi News | थंडीने गारठून शिर्डीत दोन जणांचा मृत्यू?, राज्यात अनेक शेळ्या-मेंढ्या दगावल्या

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दोन दिवसांत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पावसाच्या (Rainfall) सरी कोसळत आहेत. ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच थंडी (cold wave) आणि धुक्याचे (fog) प्रमाण वाढल्याचे पहायला मिळत आहे. थंडीमुळे जुन्नर, मालेगाव येथे शेळ्या-मेंढ्या (Goats and sheep) दगावल्या असतानाच आता शिर्डीत (Shirdi News) दोन जणांचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शिर्डी शहरातील (Shirdi News) वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीमध्ये (Shirdi News) कडाक्याच्या थंडीत गारठून दोघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. अहमदनगर मनमाड महामार्गाच्या (Ahmednagar Manmad Highway) शेजारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला तर दुसरा मृतदेह ओढ्याजवळ आढळून आला आहे. या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू थंडीत गारठून झाल्याचे बोलले जात आहे. परंतु या वृत्ताला अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

 

 

 

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील (Chandwad taluka) मौजे तिसगावातील मेंढी पाळणारे थांबले आहेत. कालच्या पावसाने त्यांच्या 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. रोही येथे गिरनारे येथील मेंढपाळ सुभाष गाढे यांच्या 15 मेंढ्या कालच्या पावसाने आणि थंडीमुळे दगावल्या आहेत. सुरेश फटांगडे यांच्या 25 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर येवला येथील राजाराम सोनवणे आणि दशरथ सोनवणे यांच्या प्रत्येकी 6 अशा एकूण 12 मेंढ्या 1 डिसेंबर रोजी थंडीने गारठून दगावल्या आहेत.

 

सिन्नर तालुक्यातील (Sinnar taluka) वडगाव पिंपळा येथील
रतन पवार यांच्या 45 मेंढ्या पावसाने व थंडीने गारठून मयत झाल्या आहेत.
देवळा तालुक्यातील सावकी येथे योगेश गायकवाड यांच्या 6 तर दिंडोरी
तालुक्यातील शिंदवड येथील ताराचंद ढेपले यांच्या 10 मेंढ्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे.
साक्री तालुक्यातील इंदोरे शिवारात शंकर गोईकर यांच्या 12 मेंढ्यांचा थंडीने मृत्यू झाला आहे.

 

 

पुणे जिल्ह्यातील (Pune district) जुन्नर व आंबेगाव तालुक्यात झालेल्या
अवकाळी पावसामुळे आणि थंडीमुळे अनेक शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत.
त्यामुळे पशुपालक व मेंढपाळ धास्तावले आहेत. जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे
पाच मेंढपाळांच्या 50 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
गोळेगाव परिसरात 15 पेक्षा जास्त शेळ्यांचा मृत्यू झाला तर आंबेगाव तालुक्यातील
विविध ठिकाणी 7 पेक्षा अधिक मेंढपाळांच्या 150 हून अधिक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.

 

Web Title :- Shirdi News | shocking-2 men died in shirdi suspect of death due to cold hundred of goats also dies in nashik and pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा