शिर्डी : साईबाबा मंदिरातील चिल्‍लरची ‘नाणी’ घेण्यास बँकेचा नकार, म्हणे ठेवणार कुठे

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डीच्या प्रसिद्ध साई बाबा मंदिराच्या दानपेटीतील जमा झालेली नाणी स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे. बँकेत नाणी ठेवण्यास जागा नसल्याचे कारण देत जवळपास दीड कोटी रुपयाची नाणी स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे. शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टचे सीईओ दीपक मुंगळीकर यांनी ही माहिती दिली. मुंगळीकर यांनी स्थानिक बँके शिवाय देशाची सर्वोच्च बँक असलेल्या रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधून ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

आठवड्यात दोन वेळा मोजली जाते दानपेटीतील रक्कम
दीपक यांनी सांगितले की, त्यांनी रिजर्व्ह बँकेसह अनेक बँकांना पत्र लिहून ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हंटले की, बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आठवड्यातून दोनदा मंदिराच्या दानपेटीतील रक्कम मोजली जाते. यावेळी सरासरी २ कोटी रुपयाच्या नोटा आणि ५ लाख रुपयाची नाणी मोजली जातात. त्यांनी सांगितले की, मंदिराच्या दानपेटीत जमा झालेली नाणी आणि नोटा ८ राष्ट्रीयकृत बँकेत एकानंतर एक म्हणजे रोटेशन पद्धतीने जमा केले जातात.

बँकेत जमा करायचेत दीड कोटी रुपयाची नाणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी संस्थानाद्वारे जमवलेले दीड कोटीची नाणी बँकेत जमा करण्यास तयार आहेत आणि संस्थान बँकेच्या नाणी स्वीकार करण्याच्या निर्णयाची वाट पाहतेय.

Loading...
You might also like