Shirdi Saibaba Sansthan | शिर्डी संस्थानाच्या बाबतचा ‘तो’ निर्णय लांबणीवर; मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे दिले कारण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Shirdi Saibaba Sansthan | गेल्या दोन महिन्यात शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या (Shirdi Saibaba Sansthan) नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाली. पण, त्यांना कारभार पाहता येत नाही. विश्वस्त मंडळाच्या (Board of Trustees) 5 जागा रिक्त आहेत. यावर नेमणुक झाल्यााशिवाय कारभार पाहता येणार नसल्याच हाय कोर्टाने (High Court) स्पष्ट केलं आहे. परंतु राज्य सरकारने (Maharashtra Government) उर्वरित पाच जागांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला नाही. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची तब्येतीचे कारण सांगून यासाठीची मुदत वाढवून घेतली आहे. त्यामुळे हा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे.

 

राज्यात तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government) आहे. त्यामुळे यांच्यात असणारा निर्णयाबाबात गोंधळ आणि इकडे न्यायालयीन प्रक्रिया यांच्यात विश्वस्त मंडळ अडकले आहे. या देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे (NCP) देण्यात आले आहे. त्यानुसार 16 सप्टेंबरला अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांची नियुक्ती केलीय. त्यांच्यासह 12 जणांचे विश्वस्त मंडळ (Shirdi Saibaba Sansthan) जाहीर केले आहे. परंतु, नियमानुसार हे मंडळ 17 सदस्यांचे आहे. अपूर्ण मंडळाच्या हाती कारभार सोपविला जाऊ शकत नाही, हा मुद्दा उपस्थित होऊन प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. यामुळे राज्य सरकारकडून उर्वरित 5 सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी वेळोवेळी मुदत घेतलीय.

 

 

 

दरम्यान, 17 नोव्हेंबरपर्यंतच्या मुदतीची सुचना देण्यात आली होती.
यानूसार आज याबाबत विचारले असता त्यावेळी सरकारी वकिलांनी आणखी मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या तब्यतीचे कारण देण्यात आले आहे.
न्यायालयाने ही विनंती मान्य करून आगामी सुनावणी 14 डिसेंबरला होणार असल्याचं सांगितलं आहे.
तसेच, तोपर्यंत पूर्वीच नियुक्त करण्यात आलेली न्यायालयाच्या देखरेखी खालील तत्कालीन समिती काम पाहणार आहे.

 

Web Title :- Shirdi Saibaba Sansthan | shirdi saibaba sansthan trust appointment issue in bombay high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा