पूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानची 10 कोटींची मदत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा जिल्‍ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. पुरग्रस्‍तांच्या मदतीसाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. संस्थानच्यावतीने पूरग्रस्तांसाठी १० कोटीची मदत जाहीर केली आहे.

शुक्रवारी मुंबईच्या सिध्दीविनायक ट्रस्‍टकडूनही पुरग्रस्‍तांसाठी पिण्याच्या स्‍वच्छ पाणी पुरवणार असल्‍याची घोषणा केली होती. या सोबतच मराठी चित्रपटसृष्‍टीतील अनेक कलाकारांनीही मदतीसाठी पाउल उचलले आहे. अनेक मराठी मालिकांमधील कलाकारांनी आपले एक दिवसांचे मानधन देणार असल्‍याचे सांगितले आहे. अनेक स्‍वयंसेवी संस्‍था, संघटना आणि ट्रस्‍टकडून मदत पुरवली जात असून, या पुरग्रस्‍तांना मानवतेच्या भावनेतून जीवनावश्यक वस्‍तूंसह त्‍यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्‍थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १० कोटीची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

पश्चिम महाराष्‍ट्रात अतिवृष्‍टीमुळे महापुराची भीषण परिस्‍थिती उद्‍भवली आहे. अस्‍मानी संकटामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. डोक्‍यावर छप्पर नाही, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही ,घालायला कपडे नाहीत अशा परिस्‍थित लोकांना समाजातील अनेक लोकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त