शिर्डीत सेनेची हॅट्रिक, लोखंडे पुन्हा जाणार दिल्लीत ; जाणून घ्या विधानसभा निहाय मतदान

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – यंदाच्या लोकसभा निवडणुकित मोदी सरकार मागील निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून आले राज्यात ४८ जागांपैकी युतीला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यात शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा एकदा शिर्डी मतदार संघात विजयाचा झेंडा फडकावला आहे

शिर्डी मतदार संघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विरूद्ध काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान यांच्यात लढत होती. या लढतीत सदाशिव लोखंडे तब्बल १ लाख २० हजार १९५ मतांनी विजयी झाले.

शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना ४ लाख ८६ हजार ८२० मते पडली आणि काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना ३ लाख ६६ हजार ६२५ मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान यांना ६३२८७ मते मिळाली ,शिर्डी लोकसभा मतदार संघात यंदा ६४.५४ टक्के मतदान झाले होते.

शिर्डी लोकसभा मतदार संघ

एकूण मतदार – १५८४३०३

एकूण मतदान – ६४.५४ %

विजयी उमेदवार – सदाशिव लोखंडे (शिवसेना )

मिळालेली मते – ४ लाख ८६ हजार ८२०

उमेदवाराला कुठून किती मतं?

१) अकोले

सदाशिव लोखंडे– ४९,५१४

भाऊसाहेब कांबळे – ८१,१६५

संजय सुखदान –३,८५२

२)संगमनेर

सदाशिव लोखंडे– ८२,२१६

भाऊसाहेब कांबळे-– ७४,५९१

संजय सुखदान –६००५

३)शिर्डी

सदाशिव लोखंडे– १,०३,७६१

भाऊसाहेब कांबळे –४०,८९०

संजय सुखदान –१३,६७७

४)कोपरगाव

सदाशिव लोखंडे – ८८,६४३

भाऊसाहेब कांबळे – ४९,३४४

संजय सुखदान –१४,१४०

५)श्रीरामपूर

सदाशिव लोखंडे– ८६,६३९

भाऊसाहेब कांबळे –६५,१८१

संजय सुखदान –१४,६६५

६)नेवासा

सदाशिव लोखंडे – ७२,६७६

भाऊसाहेब कांबळे –५२,९४२

संजय सुखदान –१०,६१३