शिर्डी गोळ्या घालून युवकाचा खून : दोघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डीतील एका हॉटेलमध्ये गोळ्या घालून युवकाचा खून करण्यात आला. मंगळवारी (दि. ११) सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आज दोघांना अटक केली आहे.

प्रतिक संतोष वाडेकर हे मयताचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काल मंगळवार दि. ११ रोजी हॉटेल पवनधाम येथे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील नितीन वाडेकर याच्याबरोबर प्रतिक वाडेकर या दोघांसह पाच जणांना फ्रेश होण्यासाठी रुम नंबर १०४ भाड्याने देण्यात आली होती. पाचजण रुममध्ये जाताच हॉटेल मालक गोविंद गरूर यांना जोरात. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. यावेळी हॉटेल मालकाने बाहेर येऊन बघितले असता तर चारजण पहिल्या मजल्यावरून खाली उतरून पळून जाताना दिसले. यावेळी यातील एका इसमास गोविंद गरूर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र गरूर दाम्पत्यास प्रतिकार करत त्याने पलायन केले. यानंतर गरुर यांनी रूममध्ये गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत प्रतिक संतोष वाडेकर यास बघितल्यावर तातडीने पोलिसांत धाव घेत झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कसून चौकशी सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी तीन पोलीस पथके तैनात करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. याबाबत घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. प्रतिक संतोष वाडेकर हा मूळ शिर्डी येथील लक्ष्मीनगर मधील रहिवाशी असून शिक्षणासाठी तो बाहेरगावी असल्याचे सांगितले. यावर्षी तो इयत्ता नववीत पास झाला असून दहावीत गेला होता. या घटनेने लक्ष्मीनगर भागात तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

You might also like