शिर्डी मतदार संघाचे निरीक्षक विरेंद्र सिंघ बंकावत शिर्डीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा मतदार संघासाठी विरेंद्र सिंघ बंकावत यांची सर्वसाधारण निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते आज शिर्डीत दाखल झाले. श्री. बंकावत भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी आहेत.

श्री. बंकावत यांचे वास्तव्य शासकीय विश्रामगृह, शिर्डी येथील कृष्णा कक्षात आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9404938589 असा आहे. श्री. बंकावत यांचे यांचे संपर्क अधिकारी म्हणून कार्यकारी अंभियंता संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9822318494 असा आहे. मतदारांना काही सूचना, तक्रारी असल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येऊ शकेल.

You might also like