शिरगावमधील गावठी दारुच्या भट्ट्या उध्वस्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – तळेगाव पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर नवीन पोलीस निरीक्षकांनी शिरगावातील पवना नदीच्या काठावर असलेल्या दारू निर्मितीच्या तीन दारू भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. ही कारवाई सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास शिरगाव येथे करण्यात आली. तसेच पाच जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांना शिरगावातील नदी किनारी दारू भट्ट्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक पवार, सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक बाजगिरे आणि तळेगाव पोलिसांनी दारू भट्ट्यांवर छापा मारला. करवाईमध्ये तीन दारू भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत.

हजारो लिटर गावठी दारू बनविण्याचे रसायन आणि तयार गावठी दारू नष्ट करण्यात आलेली आहे. पोलिसांनी सुमारे एक लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस आल्याचे समजताच संबंधितांनी घटनास्थळावरून पोबारा केला आहे. त्यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तळेगाव पोलीस त्यांचा तपास करीत आहेत.