ट्रक चालकाला लुटणाऱ्या चोरट्याला शिरपुर तालुका पोलीसांनी केले गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरपुर तालुका पोलीसांनी ट्रक चालकाला लुटणाऱ्या आरोपीला गजाआड केले. धारधार शस्त्र, रोख रोकड, मोटरसायकल जप्त करण्यात आले. अन्य दोन साथीदार पोलीसांची चाहुल लागताच फरार झाले आहे.

सविस्तर माहिती की, ट्रक चालक सतिषचंद्र श्रीदेवीलाल पाल वय – 26, रा. गिरधरपुरा सरसईनार, ता. ताखा, जि. इटवा (उत्तर प्रदेश) हा मालक ट्रक क्रं. यु.पी. 70 सि.टी.3303 घेऊन संगमनेर येथुन तंबाखुचा माल भरुन अलिगंज जि. एटा (उत्तर प्रदेश) येथे घेऊन जात असताना दरम्यान पळासनेर गावाचे पुढे बिजासन घाटात चढावर पाठिमागुन मोटरसायकलने पाठलाग करत येत अज्ञात तीन इसमांनी ट्रक अडवुन कॅबिनमध्ये चढुन सतिष पाल याला मारहाण करुन धारधार शस्त्राचा धाक दाखवुन त्याचे पॅन्टचे खिशातील रोख रक्कम 19,250 रुपये जबरदस्तीने हिसकवुन घेत पसार झाले. या प्रकरणी शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी एक पथक तयार करुन सतिषचंद्र पाल यांनी लुट केलेल्या अज्ञात व्यक्तींची माहिती त्या माहितीच्या आधारे तपासाला सुरवात केली. घटनास्थळा जवळील हॉटेल, धाबे, चहा, पानदुकाने, पेट्रोल पंप या जागेवर अज्ञात व्यक्तीची माहिती विचारपुस केली. याच दरम्यान खबरीमार्फत एक मोटरसायकल चालक साईलीला पेट्रोलपंप जवळ फिरताना आढळला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक तात्काळ त्या ठिकाणी पोहचले. मोटरसायकलस्वारला ताब्यात घेतले. या अगोदरच दोन साथीदार यांना सुगावा लागल्याने ते पसार झाले.

संशयित मोटरसायकलस्वाराला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणुन कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव जगदिश अभय उदेवाल वय – 19, रा.हनुमाननगर, शिरुड नाका, अमळनेर, जि. जळगाव त्याची अंगझडती घेतली असता लांब पात्याचा एक चॉपर व पँन्टचे खिशातुन रोख 2000 हजार रुपये व एक काळ्या रंगाची मोटरसायकल जप्त केली आहे. सदर कारवाई करुन आरोपीला गजाआड करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ. राजु भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोसई नरेंद्र खैरनार, पो.कॉ. संजय देवरे, पो.ना.संजय जाधव, अनंत पवार, गोविंद कोळी, योगेश दाभाडे आदींनी कामगीरी बजावली आहे.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like