लग्नाचा आहेर घेऊन येताना ट्रकने चिरडले, एकाचा जागीच मृत्यू

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचा आहेर घेऊन बुलेटवरून घरी येताना ट्रकने बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे टायर अंगावरून गेल्याने बुलेट चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजता शिरूर नगरपालिका कार्यालयासमोर घडली.

भानुदास दत्तू इचके (वय 40, रा. निमगाव भोगी, ता. शिरूर) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनूसार, इचके यांच्या नातेवाईकांचे लग्न होते. लग्नाचा आहेर घेण्यासाठी ते शिरूरला आले होते. काम झाल्यानंतर ते पुन्हा गावाकडे निघाले. गावाकडे जात असताना शिरूर नगरपालिका कार्यालयासमोर त्यांच्या बुलेटला राखेने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडक बसुन खाली पडल्यानंतर पोटावरून ट्रकचे टायर गेल्याने इचके यांचा जागीच मृत्यू झाला. इचके हे निमगाव भोगी चे माजी तंटामुक्ती अध्यक्ष होते तसेच ते ग्लोटेक मोल्ड इंडिया प्रा. लि. कंपनी रांजणगाव कंपनीतील युनियन चे अध्यक्ष होते.

याप्रकरणी अंकुश इचके यांनी फिर्याद दिली असून अज्ञात ट्रक चालकाविरूद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like