शिरुर : सरपंचावर फसवणूकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, संपुर्ण तालुक्यात खळबळ

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील टाकळी भीमा (ता. शिरुर) या गावचे सरपंच तसेच भारतीय जनता पार्टीच्या सरपंच आघाडीचे शिरुर तालुका अध्यक्ष रवींद्र दोरगे यांचासह पत्नी आणि वडिलांवर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंचावर फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने शिरुर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.यापूर्वी देखील रविंद्र दोरगे यांच्यावर फसवणूक व गुन्हे दाखल असल्याचे समजते. मिळालेल्या माहिती नुसार टाकळी भीमाचे सरपंच रवींद्र दोरगे यांनी तळेगाव ढमढेरे येथील दिपक आल्हाट व्यक्तीची जमीन विकत घेऊन जमीन खरेदी करताना दिलेले चेक बाउन्स झाले, त्यानंतर जमिनीच्या मूळ मालकांनी वारंवार पैशाची मागणी केली असता त्याला पैसे देण्यास टाळाटाळ केली.त्यानंतर सरपंच रवींद्र दोरगे यांने चक्क ती जमीन दुसऱ्याला विकून टाकली. मात्र जमिनीचे मूळ मालक टाकळी भिमा येथे जाऊन रवींद्र दोरगे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता रवींद्र दोरगे यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून निघून गेला. यावेळी रवींद्र चोरगे यांचे वडील बाळासाहेब दोरगे व रवींद्र दोरगे यांची पत्नी यांनी देखील जमिनीच्या मूळ मालकाला जातीवाचक शिवीगाळ केली. त्याबाबत जमिनीचे मूळ मालक दीपक आल्हाट यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सरपंच रवींद्र दोरगे याच्यासह त्याची पत्नी आणि त्याचे वडिल यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतीत सरपंच दोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हे मला जाणून बुजून मला बदनाम करण्याचे षडयंञ आहे.यामध्ये माझ्या कुटूंबीयाचा देखील काही सबंध नाही.