शिरूर : जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीनं विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

शिरूर  : प्रतिनिधी –   रामोशी बेरड या जमातीला अनुसूचित जमातीच्या यादिमध्ये समावेश करावा यांसह विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने शिरूर तहसिल कार्यालयासमोर सोमवार दि.२ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुजा शितोळे,प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे,जय मल्हार क्रांती संघटना युवकचे तालुकाध्यक्ष दिनेश चव्हाण,मातंग एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शहाजी जाधव,विजय शितोळे,आबा शितोळे,दत्ता भंडलकर,सतीश घोलप,मारूती भंडलकर,मच्छिंद्र बोडरे,दत्तात्रय बो-हाडे,सुनिल खोमणे,कैलास शितोळे,रामा शितोळे यांसह मोठ्या महिला उपस्थित होत्या.

जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे बेरड – रामोशी व त्याच्या तत्सम जाती जमातींचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत करण्यात यावा.आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी.रामोशी,बेरड,बेडर समाजाचा विकास आराखडा तयार करावा.आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या चित्रपटासाठी निधी देण्यात यावा.आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक व शुरवीर बहीर्जी नाईक यांचा पाठ्यपुस्तकांमध्ये संपुर्ण इतिहास समाविष्ट करावा.आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचा निधी देण्यात यावा.शुरवीर बहीर्जी नाईक यांचे नाव गुहागर – विजापुर राज्य महामार्गाला देण्यात यावे व रामोशी वतनी जमिन बिनशर्त परत मिळाव्यात आदि मागण्या करण्यात आलेल्या असुन मागण्यांची दखल सरकारने घेतली नाही तर राज्यातील सर्व मंत्री,आमदार,खासदार यांचे निवासस्थानासमोर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.