शिरूर : बस स्थानकात बचत गटातील महिलांना ‘स्टाॅल’ देण्याची मागणी

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर बसस्थानकात बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी स्टाॅल देण्याची मागणी येथील यशस्विनी वेलफेअर फाऊंडेशन यांच्या वतीने शिरुर चे आगार व्यवस्थापक यांच्या कडे करण्यात आली आहे. याबाबत शिरुर बसस्थानक आगार प्रमुख यांच्या कडे दिलेल्या निवेदनानुसार पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.

शिरुर बसस्थानकामध्ये अवैध चालू असलेले हाँकर्स (फिरते परवाने) रद्द करणे. महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींना दिलेले लायसन्स रद्द करुन बचत गटांना चालवण्यास द्यावे. फिरते परवाने गोरगरिब, अपंग, गरजु महिलांना चालवण्यासाठी प्रशासकीय स्थरावर आगार प्रमुखांनी ही जबाबदारी स्वीकारावी. एस.टी स्टॅण्ड मध्ये जे कँटीन आहे ते बचत गटातील महिलांना चालवण्यासाठी द्यावे.

महाराष्ट्र शासनाच्या नियमाखाली यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन ही संस्था महिलांच्या अंतर्गत कामे केली जातात. यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशन संस्थेचा उद्देश असा की बचत गटातील सर्व गोरगरिब, निराधार, अपंग, दिव्यांग महिलांना रोजी रोटी उपलब्ध करुन द्यावी.

मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा अशी विनंती आगर प्रमुखांना यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने सर्व महिलांनी केली. यावेळी नम्रता गवारे, पुष्पा जाधव, प्रियांका वेताळ, मोनिका जाधव, शारदा भुजबळ, चंदना गायकवाड, संजना वाव्हळ, ज्योती गेचगे, उषा साळवे यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.