शिरूर : ‘कोरोना’ योध्दांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय मराठा महासंघ व श्री. भैरवनाथ ग्रामविकास कला क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठान तर्डोबाचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तर्डोबाचीवाडी ता. शिरूर गावामध्ये ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसाठी आलेल्या डाॅक्टर व इतर कर्मचा-यांचा ‘कोविड योद्धा’ प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सर्व डाॅक्टर व इतर कर्मचार्यांना नाष्ट्याची सोय देखिल करण्यात आली होती. यावेळी मराठा महासंघाच्या शिरुर महिला आघाडीच्या अध्यक्षा व तर्डोबाचीवाडी गावच्या मा. आदर्श सरपंच वर्षाताई काळे यांच्या हस्ते आरोग्य तपासणीच्या प्रमुख डाॅ. अंकिता गुजर, तर्डोबाचीवाडी गावात नव्याने रुजु झालेले ग्रामसेवक नंदकुमार वैद्य, झोनल ऑफिसर मगर, जांभळीमळा शाळेचे मुख्याध्यापक रमेश उबाळे, तांबोळी,आरोग्यसेविका दिपाली शिर्के, अंगणवाडी सेविका मनिषा बिडगर, सुवर्णा कर्डीले, चंद्रकांत देवकाते यांचा ‘कोरोना योद्धा’ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख संजय पोटावळे, राहुलदादा पोटावळे, संतोष कर्डीले, जालिंदर कुरंदळे, शंकर कुलाळ, अंकुश पाचर्णे, चंद्रकांत पाचपुते, ग्रामपंचायत लिपीक कांतीलाल कर्डीले, भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सटाले, उपाध्यक्ष आप्पा पाचर्णे, खजिनदार मनोज कुलाळ, अनिकेत पाचर्णे, विरेंद्र कुरंदळे, सुरेश काळे, शैलेश पोटावळे, निलेश पवार आदि उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like