शिरूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ! एका दिवसात 56 गावात तब्बल 382

शिक्रापुर : शिरूर तालुक्यातील ५६ गावात एका दिवसात तब्बल ३८२ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली आहे. शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक आहे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

शिरूर तालुक्यात वाढती कोरोना बाधित संख्या लक्षात घेता शिरूर तालुक्यात दुसरी कोरोनाची लाट पसरत आहे अशी भीती वाटू लागली आहे.

त्यामुळे तालुक्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आता प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा शिरूर तालुक्यात कोरोनाचा कहर आणि कहर होईल हे मात्र आता नक्की खरे.

शिरूर तालुक्‍यात आज पर्यंत ९८०३ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ८०९२ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.तर आज पर्यत १८६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १५२५ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे.

शिरूर तालुक्यात काल सणसवाडी २०, शिक्रापूर ७३, तळेगाव ढमढेरे २२, कासारी १, निमगाव म्हाळुंगी १२,पारोडी २,दरेकरवाडी १,कोंढापुरी १,टाकळी भीमा २, बुरुंजवाडी १,,कोरेगाव भीमा ८,रांजणगाव गणपती २४, वाघाळे ४, ढोक सांगवी १, भांबर्डे १,पिंपरी दुमाला २, खंडाळे १,कुरूळी १, मांडवगण फराटा ४४, सादलगाव १,इनामगाव ३,वडगाव रासाई ३, शिरसगाव काटा ६, तांदळी १, बाभुळसर खुर्द ६, न्हावरे १३, उरळ गाव ३, नागरगाव २, गुनाट १, रांजणगाव सां १, निर्वी १, आंबळे ६, चिंचणी ३, आंधळगाव ५, निमोने ५, पिंपरखेड ६, जांबुत ३,काठापुर १, टाकळीहाजी ५, कारेगाव १४, शिरूर ग्रामीण २४, सरदवाडी २, तर्डोबाचिवाडी ९, करडे १, मलठण ३,करडीलवाडी १,चव्हाणवाडी १, निमगाव भोगी १,केंदुर १, करंदी १,,पाबळ २, पिंपळेेे जगताप १,आपटी १,धामारीीू २ वढू बुद्रुक ४,शिरूर शहर २० असे शिरूर तालुक्यातील ५६ गावात ३८२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावणे, गर्दी करू नये ,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये ,सोशल डिस्टन्स पाळावी व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावी असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.