शिरूरमध्ये ‘कोरोना’चे 7 नवे पॉझिटिव्ह

शिरूर  : प्रतिनिधी –  शिरूर शहरात बुधवारी सात रूग्णांचे अहवाल कोरोना बाधित आल्याची माहिती ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी दिली.शहरातील मुख्य बाजार पेठेत कोरोनाने शिरकाव केला असुन दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरवासियांची धाकधुक वाढली आहे.

शहरात वाढत असलेल्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर करण्यात आला होता.या लाॅकडाऊनचा दहा दिवसांचा कालावधी काल दि.२८ मंगळवार रोजी संपला असुन रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसुन येत आहे.मंगळवार दि.२८ रोजी शहरातील विविध भागात चार तर बुधवार दि.२९ रोजी शहरात सात रूग्णांचे अहवाल कोरोना बाधित आल्याने या दोन दिवसात शहरातील विविध भागात ११ जणांचे अहवार बाधित आले असल्याने दिवसेंदिवस वाढणारी रूग्ण संख्या पाहाता शहवासियांची चिंता वाढली आहे.

बुधवार दि.२९ रोजी शहरातील मुख्य कापड बाजार पेठेत एक,प्रितम प्रकाश नगर एक,हलवाई चाैक एक,बी.जे.काॅर्नर एक,कैकाड आळी एक,स्टेट बँक काॅलणी एक व अजुन एका भागात एक आदि सात रूग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी दिली.

दिवसेंदिवस शहरातील वाढती रूग्ण संख्या पाहाता शहरवासियांनी घाबरून न जाता चेह-यावर मास्क लावणे,गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे,अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण चेह-याला मास्क न लावता फिरू नये,वेळोवळी हात साबनाने स्वच्छ धुणे यांसह प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःबरोबरच कुटूंबाची व इतरांची काळजी घेऊन संसर्गापासुन सुरक्षितता राखणे गरजे असल्याचे नागरीक बोलुन दाखवत आहेत.