Shirur Crime | शिरूरचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

शिक्रापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Shirur Crime | शिरुर (Shirur Crime) तालुक्यातील जातेगाव बुद्रुक (Jategaon Budruk) येथील गावातील पवार कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने केलेल्या अतिक्रमण बाबत जिल्हाधिकारी (Collector) यांच्याकडे तक्रार केली आहे. याच रागातून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे (shirur krushi utpanna bazar samiti) माजी सभापती प्रकाश बाबासाहेब पवार (Prakash Pawar) यांनी ऐकाला शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) येथे अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातेगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत मध्ये शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे
माजी सभापती प्रकाश पवार यांचे पुतणे राहुल सुरेश उमाप (Rahul Umap)
हे ग्रामपंचायत सदस्य (Gram Panchayat member) आहे.
त्यांनी गायरान जागेत गाळा बांधुन अतिक्रमण केले आहे.
या प्रकरणी गावातील गोरक्ष पवार, शरद उमाप, नामदेव उमाप, निलेश उमाप,
आप्पा मोरे व नवनाथ इंगवले यांनी ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार यांनी
केलेल्या अतिक्रमण बाबत पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून
ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार यांचे सदस्यपद रद्द कराण्याबाबत मार्च 2019 मध्ये दावा केला आहे.

 

याच रागातून चिडून जाऊन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी
गोरक्ष पवार यांना वारंवार फोन करून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे करण्याची धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी गोरक्ष तुकाराम पवार (वय 45 रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
गोरक्ष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत गोरक्ष पवार यांचे भाडेकरू असलेल्या महिलेला देखील शिवीगाळ करून खोली खाली करा अशी दमदाटी केली असल्याचे म्हटले आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

 

Web Title : Shirur Crime | File a case against former Shirur Speaker Prakash Pawar, find out what the case is

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Medal in Olympics | हरियाणाच्या सुपुत्राने घडवला इतिहास, वाचा Neeraj Chopra ची पूर्ण प्रोफाईल

Raj Kundra Pornography Case | ‘शिल्पा शेट्टीला आवडतात अश्लील व्हिडीओ’, ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

EPFO Rules | PF खातेधारकांनी तात्काळ अपडेट करावी वारसदाराची माहिती, अन्यथा होईल 7 लाखाचे नुकसान; जाणून घ्या