प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलीला अश्लील Video दाखवत लैंगिक अत्याचार, शिरूर तालुक्यातील खळबळजक घटना

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वताच्या पोटच्या अल्पवयीन मुलीला आई आणि आईच्या प्रियकराने जबरदस्तीने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवत अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर परिसरात घडला असून पोलीस स्टेशन येथे पिडीत मुलीची आई व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार शिरूर येथील पिडीत मुलीची आई ही प्रियकर विजय पाटील या प्रियकराला नेहमी घरात घेत असून दोघे घरात दारू पिऊन अश्लील कृत्य करत, यावेळी विजय पाटील हा पिडीतेला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत तुझी आई व मी जे करतो ते माझे सोबत कर तुला मजा येईल असे म्हणून पिडीतेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत असे.

बाबत पिडीत मुलगी प्रतिसाद देत नसल्याने याबाबत  कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी  देखील देत असे तर पिडीतेची आई हि स्वतः च्या मुलीला तिचा प्रियकर विजय पाटील हे तुझे वडील आहेत त्यांना तू पप्पा म्हणत जा आणि ते तुला जसे म्हणतात तू तसे करत जा. याबाबत आई व आईच्या प्रियकराकडून होणारे अत्याचार असाह्य होऊ लागल्याने पिडीतेने तिच्या आत्याला याबाबत सर्व हकीगत सांगितली, याबाबत पिडीत मुलीच्या आत्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरूर पोलिसांनी पिडीत अल्पवयीन युवतीची आई  व तिचा प्रियकर विजय अर्जुन पाटील (रा. खारमळा शिरूर ता. शिरूर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत दोघांना देखील अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक गणेश जगदाळे हे करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like