दारुच्या नशेत एकावर चाकुने वार, शिरुर पोलिसांत FIR

शिक्रापुर : प्रतिनिधी –  शिरुर तालुक्यातील निर्वी येथे दारूच्या नशेत एकाने काही कारण नसताना एकावर चाकुने मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे .
याबाबत प्रदीप वाल्मीक टेमकर (रा. निर्वी) यांनी फिर्याद दिली असून सोनबा बबन आखुटे (रा. निर्वी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी फिर्यादी एका चिकनच्या दुकानावर चिकन घेण्यासाठी थांबले असताना ,यावेळी सोनबा आखुटे हा अचानक या दुकानावर येऊन फिर्यादीला काही एक कारण नसताना, सोनबा आखुटे याने खीशातून चाकू काढून फिर्यादी प्रदीप टेमकर याच्या गळ्याला, पोटाचे बेंबी जवळ चाकू मारून दुखापत केली आहे.

याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे..