शिरूर : आण्णापूर येथील गहिनीनाथ मंदिरात चोरी

शिक्रापुर – शिरुर तालुक्याच्या अण्णापूर येथील गहिनीनाथ मंदिराचा दरवाज्याच्या कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून, मंदिरातील दानपेटी फोडून व त्याच्या शेजारी असणारे साहित्य एकूण किंमत 29 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याची माहिती शिरुर पोलिसांनी दिली आहे.

ही घटना 25 नोव्हेंबर सायंकाळी सात ते 26 नोव्हेंबर पहाटे चारच्या दरम्यान घडली असून याबाबत अण्णापूरचे पोलीस पाटील अप्पा दादू जाधव यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती नुसार 25 नोव्हेंबर रोजी राञी मंदिर बंद केल्यानंतर पहाटे पोलीस पाटील जाधव यांना कैलास दळवी यांचा फोन आला व त्यांनी खानापूर गावातील गहिनीनाथ मंदिरात चोरी झाल्याचे सांगितले. नंतर पोलीस पाटील गहिनीनाथ मंदिरात गेलो व मंदिराची पाहणी केली असता मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील कपाट उघडले होते, लॉकर वाकलेले होते तर दान पेटी फोडली होती. मंदिरातील एक इन्व्हर्टर, बॅटरी, माइक, साऊंड व दानपेटीतील अंदाजे पाच हजार रुपये रक्कम असा 29 हजार 500 रुपये चा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.

याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे करीत आहे.