शिरूर : नारळाच्या झाडाच्या आळ्यावर दगड ठेवल्याच्या कारणावरून मारहाण

शिक्रापुर  : प्रतिनिधी –   शिरूर तालुक्यातील निमोणे येथे शेतातील नारळाच्या झाडाचे आळ्यावर दगड ठेवल्यावरून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बाळासाहेब रावसाहेब काळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी जयश्री बाळासाहेब काळे (वय ३०)रा.पिंपळाचीवाडी निमोणे ता.शिरूर यांनी शिरुर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी संजय राजाराम काळे,धनजंय शहाजी काळे,संभाजी येधू काळे या तिघांवर भादवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार दि.११ ऑगस्ट रोजी बाळासाहेब काळे हे आपल्या शेतातील गट नंबर ४७१ मधील नारळाचे झाडाचे आळ्यावर दगड ठेवत होते.यावेळी धनंजय काळे याने हातात दगड घेत बाळासाहेब यांच्या डोक्यात मारत दुखापत केली.त्याचबरोबर त्याच्या बरोबर असलेल्या सर्वांनी शिवीगाळ दमदाटी करत हाताने व लाथाबुक्यानी मारहाण करत हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like