Shirur Crime | दुर्दैवी ! 4 वर्षाच्या मुलासह आईची आत्महत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; शिरुर तालुक्यातील खळबळजनक घटना

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – Shirur Crime | चार वर्षाच्या मुलासह आईने विहिरीत उडी (jumping in well) घेऊन आत्महत्या (woman committed suicide) केल्याची धक्कादायक घटना शिरुर (Shirur Crime) तालुक्यातील करंदी येथे घडली आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीनेही आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोनिका भगवान चंद्रावळे (वय-30) व साई उर्फ ऋषी भगवान चंद्रावळे (वय-4) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये (Shikrapur Police Station) नोंद करण्यात आली आहे.

मोनिका चंद्रावळे (Monica Chandravale) या काही दिवसांपासून तणावात होत्या. मोनिका या सकाळी चार वर्षाच्या साईला घेऊन कोठेतरी गेल्या. दुपारी शेजारी काही नागरिक शेतात काम करत असताना विहिरीमध्ये त्या दोघांच्या चपला पाण्यावर तरंगताना आढळून आल्या. त्यमुळे या माय-लेकांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, काही नागरिकांनी लोखंडी गळ व दोरीच्या सहाय्याने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विहिरीमध्ये मोनिका आणि साई यांचा मृतदेह मिळून आला. पत्नी आणि मुलाच्या आत्महत्येनंतर पती भगवान यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.
भगवान यांच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात (Pune private hospital) उपचार सुरु असून त्यांची परिस्थिती स्थिर आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | ‘तुम्हीच शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची यादी द्या’ ! महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जबाबदारी झटकली; पुणे मनपा ‘निर्णायकी’ अवस्थेत

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी केले अटक

LPG Cylinder Subsidy | तुम्हाला सुद्धा LPG वर सबसिडी मिळत नाही का?, चेक करा ‘हे’ कारण तर नाही ना? खुप सोपी आहे पद्धत, जाणून घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 238 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

India Post Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2357 जागेसाठी भरती; जाणून घ्या

Cyrus Poonawalla | शरद पवारांच्या मित्राकडून PM मोदींचं कौतुक