शिरुर – हवेली मतदार संघात सरासरी 65 % मतदान !

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीची मतदार प्रक्रिया आज पूर्ण झाली यात शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात सरासरी 65 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले. यात पूर्व हवेलीत मतदानाचा उत्साह मोठा होता गेली दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आज प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी पूर्ण उघडीप दिल्याने मतदानाचा टक्का चांगला झाला.

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रचारारात प्रत्येकांनी आपापल्या परीने मतदार राजाला आपलंस करण्याचा प्रयत्न केला. त्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पडणार्या पावसाने उमेदवारांची भंबेरी उडाली.परंतु आज सोमवारी मतदार प्रक्रिया पार पडताना पावसाने उघडीप दिली.तसेही मतदार सकाळीच मतदान केंद्रावर रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते.यावेळी या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात सरळ लढत होत असून ही लढत चुरशीची होणार हे नक्की. आज मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले बहुमुल्य मत टाकले यासाठी दि.24 ऑक्टोबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर उरुळी कांचन, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा यासह सर्वच गावामध्ये मतदारात मोठा उत्साह पहावयास मिळत होता.ठिकठिकाणी सकाळ पासून रांगा लावल्या होत्या.सुरुवातीला थेऊर येथील काकडेमळा येथे मतदान केंद्रावर इ व्ही एम मशिम बंद पडली परंतु विभाग प्रमुखांनी तात्काळ दुरुस्ती करुन मतदान प्रक्रिया पूर्ववत केली.

दिवसभर महसूल व पोलिस खात्याकडून चोख बंदोबस्त ठेवला होता. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप कांबळे, पोलिस कर्मचारी नितिन सुद्रीक, संदीप कदम, सागर कडू तसेच होमगार्ड यांनी सहकार्य केले. तसेच थेऊर येथे गावच्या पोलिस पाटील रेश्मा कांबळे तर कुंजीरवाडी येथे गावचे पाटील पाटील मिलिंद कुंजीर परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

Visit  :Policenama.com