हॉस्पिटलला हायफ्लो ऑक्सिजन मशीन भेट

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठाण यांच्या सहकार्याने शिरूर-हवेली विधानसभा आमदार अशोक पवार व जिल्हा परिषद सदस्या मा.सभापती (कृषी व पशुसंवर्धन) सौ. सुजाता भाभी पवार यांच्या विशेष प्रयत्नातून वरदविनायक हॉस्पिटल मधील कोविड सेंटर साठी एचएफएनओ मशीन भेट देण्यात आली आहे.

या मशीन व्दारे कोरोना पॉझिटिव्ह अत्यवस्थ रुग्णाला नेहमीच्या ऑक्सिजन पेक्षा पाचपट जलद वेगाने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी उपयोग होतो. ही बहुमूल्य अशी मशीनची भेट हॉस्पिटलला मिळाली त्यामुळे हॉस्पिटलच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र काळे यांनी खासदार अमोल कोल्हे व जगदंब प्रतिष्ठाण व आमदार अशोक पवार व सौ सुजाता पवार यांच्या प्रयत्नांबद्दल तसेच हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरु करुन पेशंटची सोय उपलब्ध करुन योग्य प्रकारे उपचार करीत असल्याबद्दल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, स्टाफ यांचे आभार मानले.

यावेळी सरपंच शिवाजी कदम, मा. चेअरमन बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, शंकरराव फराटे, धनंजय फराटे, सुरेश जगताप, सागर फराटे, दिलीप फराटे, शरद चकोर, यशवंत गायकवाड, ग्राम विकास अधिकारी केंच सौ. सुरेखाताई जगताप, सौ. प्रतिभाताई बोत्रे, सौ. मनीषाताई सोनवणे असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. हा सर्व कार्यक्रम सामाजिक अंतर व शासनाचे नियम पाळून करण्यात आला.